ग्रेट बेअर सरोवर
ग्रेट बेअर सरोवर : संपूर्णतः कॅनडाच्या हद्दीत असलेले सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. क्षेत्रफळ ३१,९१५ चौ. किमी. हे कॅनडाच्या नॉर्थवेस्ट टेरिटरी भागात, मॅकेंझी विभागात, मॅकेंझीच्या खोऱ्यात ६४° ४७' उ. ते ६७° २३' उ. व ११७° प. ते १२५° ६' प. यांदरम्यान असून त्याची लांबी ३८o किमी. व रुंदी ४o ते १७६ किमी. आहे.